तुला कोणती पोस्टिंग हवी? नामांकित मॉलमध्ये सुरक्षारक्षक महिलेवर सहकाऱ्याकडून अत्याचार, पुण्यातील घटनेने खळबळ..


पुणे : पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज धोंडीराम कदम (वय.४५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीसह खाजगी सुरक्षा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होती. हे दोघेही वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये सुरक्षा कर्तव्य बजावत होते. याच कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या मनोज धोंडीराम कदम याने ड्युटीदरम्यान पीडित महिलेला तिसऱ्या मजल्यावरील एका बंद खोलीत नेले.

तेथे आरोपीने महिलेला तुला कोणती पोस्टिंग हवी? असा विचारणा केली. यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील वर्तन करत शारीरिक जबरदस्ती केली. महिलेने तात्काळ त्याला विरोध केला आणि प्रतिकार करत त्याला मारहाण केली. मात्र, आरोपीने तिचा प्रतिकार झुगारून देत लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तिच्या तक्रारीवरून आरोपी मनोज कदम याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 351(2) आणि 351(3) अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वाकड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!