पुण्यात थरारक घटना! लिफ्टमध्ये चढले, काहीच वेळात ती धाडकन आदळली, आत चिमुकल्यासह सात जण अन्…


पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका इमारतीची लिफ्ट कोसळून भीषण दुर्घटना झाल्याची माहिती आहे. वाघोली परिसरातील एका इमारतीमध्ये लिफ्ट कोसळली आहे. चौथ्या मजल्यावरून खाली येण्यासाठी हे रहिवाशी लिफ्टमध्ये चढले होते, तेव्हा ही घटना घडली आहे.

वाघोलीतील अर्बनो नावाच्या अलिशान सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. घटनेवेळी या लिफ्टमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एक लहान मुलगा असे एकूण सहा जण होते. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र मोठी दुर्घटना होता होता राहिली.

लिफ्ट सुरु झाल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर येताच ही लिफ्ट कोसळल्याने लिफ्टमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत तपास सुरू केला जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.

सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना लिफ्टमधील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लिफ्ट कोसळल्यानंतरही लिफ्टमधील सर्वजण सुखरूप बाहेर आले. यामुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे इमारतीमधील रहिवाशांमध्ये लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!