मोठी बातमी! गोविंद बर्गे प्रकरणातील पूजा गायकवाडच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा, थेट लॉज कनेक्शनच…

पुणे : कलाकेंद्रात नृत्य करणारी पूजा गायकवाड हिच्या प्रेमात वेडे झालेले बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासें समोर येत आहेत. याप्रकरणी कोठडीत असलेल्या पूजाची कसून चौकशी करण्यात येत असून आता ते दोघे कधी तर फ्लॅटवर भेटायचे तर परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर सोबत राहत असल्याची कबुली पूजाने दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

माजी उपसरपंच गोविंद बर्गे पूजाच्या प्रेमात वेडा झाला होता. पूजानेही त्याच्याशी प्रेम संबंध ठेवले. त्याच्या मृत्यूप्रकरणी आता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पूजाची कसून चौकशी करण्यात येत असून तिचे व मृत गोविंद बर्गे यांचे कॉल रेकॉर्ड्स तसेच चॅट्सही पोलिसांकडून तपासण्यात आले आहेत. आणि त्यातून बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे हे कला केंद्रात गेल्यावर तिथे पूजाशई ओळख झाली, ती वाढली . पण पूजा आणि गोविंद यांचं नातं फक्त डान्सर आणि कस्टमर असं नव्हे तर त्यापुढे गेलं होतं. ते कधी फ्लॅटवर तर कधी लॉजवर भेटायचे.दरम्यान वर्षभराच्या काळात त्याने तिला पैसा, अडका, जमीन, दागिने, महागडे मोबाईल घेऊन दिले. तसेच तिचं घर घेण्यासाठीही त्याने आर्थिक मदत केल्याचे समोर आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने गेवराईच्या बंगल्यासाठी तगादा लावला आणि गोविंदच्या नावे असलेली जमीन भावाच्या नावे करण्याचीही तिची मागणी होती. गोविंद ऐकत नाही म्हटल्यावर तिने त्याच्याशी संपर्क तोडला, त्याला ब्लॅकमेलही करू लागली. यामुळेच निराश होऊन, तणावातून गोविंद सासुरे गावात पूजाला भेटायला गेला, तिथेही ती न भेटल्याने त्याने अखेर कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं.
दरम्यान पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून पूजा गायकवाड हिची चौकशी तर सुरू आहेच, त्यासोबतच तिचे सहकारी , तिच्या मैत्रिणींचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकारात आणखीन काही माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
