वडीलोपार्जित जमिनीची खोटी कागदपत्रे जोडुन, बनावट दस्त करून महिलेची आर्थिक फसवणूक ; सासवड येथील प्रकार उघड ….

लोणी काळभोर : वडीलोपार्जित जमिनीची खोटी कागदपत्रे जोडुन, बनावट दस्त करून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील सासवड येथे घडली आहे. दस्त रद्द करण्याची विनंती सदर महिलेने केली असता तिच्या अंगावर पिस्तुल ताणुन ८ लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी एका २८ वर्षीय महिलेने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या़ंवरुन अनुश्का सचिन जाधव (वय ३६) व सचिन जाधव (वय ४३) दोघेही राहणार सासवड, ता पुरंदर, जि पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांमधील सचिन जाधव हे वकील आहेत. सदर प्रकार हा १ जानेवारी २०२४ ते ११ जून २०२५ या कालावधीत घडला आहे.फिर्यादी महिलेची यांची वडिलोपार्जित मिळकत आहे. त्या जमीनीची खोटी कागदपत्रे तयार करून ती विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गट क्रमांक 1303 व 1313 मधील 18.50 गुंठे जमीन असल्याचा उल्लेख असताना नोंदणीकृत दस्तात 1396, 1304, 1322, 1324, 1346, 1357 1372, 1404, 1415, या गटांचा समावेश करून बनावट व्यवहार करण्यात आला आहे. त्यातून ८ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पिस्तूल दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी सदर महिलेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली असून तिच्या स्त्री मनास लज्जा निर्माण होईल अशा पध्दतीने जाणीवपुर्वक स्पर्श करून व ढकलुन बाहेर काढले आहे. अशी फिर्याद महिलेने सासवड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.
