Nano Banana ट्रेंडच्या नादी लागू नका! तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा, जाणून घ्या महत्वाची माहिती..


मुंबई : सोशल मीडियावर नवनवीन AI फोटो टूल्स तरुणाईला मोहात पाडत आहेत. काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या ‘Ghibli ट्रेंड’ नंतर आता ‘Nano Banana’ ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. या ट्रेंडमध्ये वापरकर्ते स्वतःचे हटके, 3D मॉडेलसारखे फोटो तयार करून व्हायरल करत आहेत.

मात्र या मजेदार दिसणाऱ्या टूलमागे मोठा सायबर धोका दडलेला असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. सायबर अवेअरनेस फाउंडेशन, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सायबर क्राईम एक्सपर्ट धनंजय देशपांडे यांनी या ट्रेंडबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.

‘Nano Banana’ टूल वापरताना मोबाईल गॅलरी, ईमेल अशा अनेक परवानग्या द्याव्या लागतात. यामुळे तुमची खासगी गॅलरी, फोटो, ईमेल डाटा थेट त्यांच्या सर्व्हरवर पोहोचतो.

तसेच एकदा तुमची गॅलरी हॅकर्सच्या ताब्यात गेली तर फोटो लीक होणे, मॉर्फिंग, ब्लॅकमेलिंग यांसारखे गंभीर धोके संभवतात. देशपांडे यांच्या मते, याआधीच्या Ghibli ट्रेंडमध्येही अनेकांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. अगदी तसाच धोका या नव्या ट्रेंडमध्येही आहे.

हॅकर्स तुमचे फोटो हाताळून ते अश्लील किंवा फेक स्वरूपात बदलू शकतात, आणि मग पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करू शकतात. यामुळे केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!