एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; सोडून गेलेले पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्याकडे लवकरच परत येणार…


पुणे : राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक केंद्रस्थानी असणार आहे. यावर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. असे असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावरच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले 15 नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात कोणकोणत्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही

गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरेंकडे असणारे 15 माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले होते. आता हेच नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात हे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे आले तर शिंदेंसाठी ऐन निवडणुकीच्या काळात हा मोठा फटका असणार आहे तर मुंबईत ठाकरेंची ताकद चांगलीच वाढणार आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची मनसेशी युती करण्यासाठी बोलणी चालू आहे. असे असतानाच आता ठाकरेंचे शिंदेंना मिळालेले 15 नगरसेवक परत ठाकरेंकडे जात असतील तर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा धक्का असू शकतो.

दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आज ठाकरेंची आमदार आणि खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी या आमदार आणि खासदारांना मार्गदर्शन केले. याच बैठकीत शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या एकूण 46 माजी नगरसेवकांचा विषय निघाला. आता परत येणाऱ्या 15 नगरसेवकांना पक्षात घ्यायचे की नाही?याबाबत पक्षाने भूमिका ठरवली पाहिजे, अशी भूमिका आमदार, खासदारांनी मांडली. त्यामुळे आता नेमका काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!