आयुष कोमकर हत्याप्रकरण ; आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या रडावर आता प्रतिस्पर्धी सोम्याचीही गॅंग…

पुणे : पुण्यातील नानापेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणाबाबतची महत्वाची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी अटकेत असलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या रडारवर प्रतिस्पर्धी सोमनाथ गायकवाड सदस्यही असल्याचे टोळीतील उघडकीस आले असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करीत आहेत.

आयुष कोमकर हा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे तो बंडू आंदेकरचा नातू असल्याची माहिती समोर आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुषचा खून घडवून आणल्याच तपासात स्पष्ट झालं. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून इतर फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.दरम्यान या प्रकरणी आता आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती गोळा केली जात असून, कृष्णा आंदेकरसह अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, विशेष ‘मकोका’ न्यायालयाने अटक आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या पोलिस कोठडीत २२ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
वनराज माजी नगरसेवक आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुषचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) हिने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
