बॉलीवूड हादरलं! अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार, ‘या’ गॅंगने स्वीकारली जबाबदारी…


मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दिशाच्या उत्तर प्रदेशातील बरेलीतील घरावर हा गोळीबार झाला आहे. पहाटे ३.३० ते ४ च्या आसपास हा गोळीबार झाल्याचे समोर आली आहे.

या घरात सध्या दिशा पाटनीचे वडील, निवृत्त डिप्टी एसपी जगदीश पाटनी राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम मोटरसायकलवरून आले आणि सिव्हिल लाईन्स परिसरातील घराच्या मुख्य दरवाजावर तसेच भिंतीवर चार-पाच फायरिंग केली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर तातडीने पोलिस फोर्स घराबाहेर तैनात करण्यात आला असून एसपी सिटी व एसपी क्राईम यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी हिने प्रेमानंदजी महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा केला.

तसेच संत आणि धर्मांविरोधात बोलणाऱ्यांना परिणाम भोगावा लागेल, अशी उघड धमकीही दिली. पण, ही पोस्ट नंतर डिलीट करण्यात आली आहे. गोल्डी ब्रार हा तोच आहे ज्याने सलमान खानला धमकी दिली आहे.

रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये प्रेमानंद महाराजांचा अनादर केल्यामुळे गोळीबार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलाना) आहे. बंधूंनो, आज खुशबू पटानी, दिशा पटानी यांच्या घरावर (व्हिला नंबर 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, उत्तर प्रदेश) झालेला गोळीबार आम्ही केला आहे.

या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, तिने पूज्य संतांचा (प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज) अपमान केला आहे. तिने सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही. हा संदेश केवळ तिच्यासाठीच नाही तर चित्रपट क्षेत्रातील सर्व कलाकारांसाठी आणि त्याच्याशी संबंधित लोकांसाठी आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!