भोर उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा, नागरिकांचे प्रचंड हाल, खासदार सुप्रिया सुळे यांचा थेट आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा…


भोर : येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा साठा उपलब्ध नाही. यामुळे येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. येथे दररोज किमान ५००-६०० रुग्ण उपचारासाठी येतात. खोकल्याचे औषध, ‘बीपी’च्या गोळ्या यांसारखी औषधेही येथे उपलब्ध होत नाहीत.

विशेष म्हणजे येथून औषधं आणण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास देखील पुरेशी औषधे उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा साठा नसणे ही आरोग्यव्यवस्थेची स्थिती गंभीर असल्याचे लक्षण आहे. यामुळे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

नागरीकांना शासनाकडून किमान आरोग्याच्या सुविधा तरी व्यवस्थितपणे पुरविल्या जाणे अपेक्षित आहे. या रुग्णालयात उपचारासाठी येणारे लोक दुर्गम भागातून येतात. औषधे नसल्याचे त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला आहे.

त्या म्हणाल्या, माझी राज्याच्या आरोग्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण याची गांभीर्याने नोंद घ्यावी. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करण्याबाबत तातडीने संबंधित विभागाला सूचना द्याव्या, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली आहे.

तसेच औषधांचा साठा योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्यावी. रुग्णांच्या सेवेला आपले सर्वोच्च प्राधान्य असणे आवश्यक आहे. असेही त्या म्हणाल्या. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून नागरिकांचे हाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!