एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी UPI सेवा राहणार बंद, जाणून घ्या…

नवी दिल्ली : एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बॅकेच्या ग्राहकांना काही तासांसाठी युपीआय सेवा वापरता येणार नाही. याबाबत बँकेने ग्राहकांना माहिती दिली आहे. यानुसार 12 सप्टेंबर 2025 रोजी सिस्टम मेंटेनन्समुळे एचडीएफसी बँकेचे ग्राहक यूपीआय सेवा वापरू शकणार नाहीत.

बँकेच्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 1:30 वाजेपर्यंत (एकूण 90 मिनिटे) एचडीएफसी बँकेच्या UPI सेवा पूर्णपणे बंद राहतील. या काळात बँकेच्या सिस्टीमचे मेंटेनन्स व अपडेटिंग केले जाणार आहे.
या काळात बँकेशी संबंधित महत्वाच्या डिजिटल सेवांवर परिणाम होणार आहे. बँकेच्या ॲपवरून पेमंट, रुपे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट आणि एचडीएफसी खात्यातून थर्ड पार्टी ॲप्सद्वारे (गुगल पे, फोनपे) पेमेंट करता येणार नाही. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला एचडीएफसी खात्यावर पेमेंट स्वीकारले तर त्यालाही त्रासाचा सामना करावा लागू शकते. यामुळे या काळात व्यवहार टाळण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.

दरम्यान, 90 मिनिटांसाठी एचडीएफसीच्या ग्राहकांना त्रासाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात HDFC बँकेने ग्राहकांना PayZapp वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे HDFC बँकेचे स्वतःचे डिजिटल पेमेंट ॲप आहे, ज्याद्वारे तुम्ही UPI बंद असतानाही व्यवहार करता येतो. यासाठी PayZapp डिजिटल वॉलेटसारखे काम करते. याद्वारे, बिल पेमेंट, ऑनलाइन शॉपिंग, तसेच पैसे पाठवता येतात. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बँकेना हा पर्याय सुचवला आहे.
HDFC बँकेची नेट बँकिंग सेवा मात्र २४x७ उपलब्ध राहील. नेट बँकिंगमधून 200 पेक्षा जास्त प्रकारचे व्यवहार करता येतात. फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट, FD उघडणे, क्रेडिट कार्ड पेमेंट यांसारखे व्यवहार नेट बँकिंगवरून सुरू राहतील.
ग्राहकांसाठी महत्वाचे..
जर तुम्ही व्यापारी असाल आणि ग्राहकांकडून UPI पेमेंट घेत असाल, तर ही वेळ लक्षात घेऊन पेमेंट कलेक्शनची योजना करा.
मोठे व्यवहार, EMI पेमेंट किंवा ऑनलाइन शॉपिंगचे पेमेंट आधीच करून घ्या.
1:30 नंतर सेवा पुन्हा सामान्य होईल आणि UPI ट्रान्झॅक्शन पूर्ववत सुरू होतील.