परळीत १२ वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार, ८ दिवसातील दुसरी घटना, घटनेने बीड पुन्हा एकदा हादरलं…


बीड : बीड जिल्ह्यातील परळी शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बरकत नगर परिसरात राहणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय बालिकेवर दोन तरुणांनी अत्याचार केला असून आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केली आहे.

या घटनेनंतर परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परळीतील रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नुकतीच घडली असून पीडित बालिका आपल्या घराजवळ असताना आरोपींनी तिला फसवून नेलं. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आणखी दोन जणांनी आरोपींना साथ दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या आठ दिवसांपूर्वीच परळीतील रेल्वे स्थानक परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा असाच प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथील रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (३१ ऑगस्ट) दुपारी घडली. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी बरकत नगर येथील आरोपीला अटक केली.

या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, इतर दोघांवर मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं असून पोलिसांनी लवकरच सर्व आरोपींना पकडले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!