धक्कादायक! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक, 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….


धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री-पिंपळनेर रस्त्यावर एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्रीहून पिंपळनेरकडे जाणारी परिवहन महामंडळाची बस कान नदीच्या पुलाजवळ आली असता पिंपळनेरहुन साक्रीकडे जाणाऱ्या दुचाकीला धडकली.या धडकेत करणारी लक्ष्मी दिनेश जयस्वाल (वय १२) आणि तिची आई माधुरी दिनेश जयस्वाल (वय ४०) गंभीर जखमी झाले. दुचाकीवर प्रवास करणारे जयवंत दखल सूर्यवंशी (वय ३५) आणि दिनेश रमेश पावरा (वय ५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर नागरिक आणि पोलीसांनी तत्काळ जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेत लक्ष्मी या विद्यार्थिनीला उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.परिसरात या अपघातामुळे संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, बसचालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक
माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!