ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? शिंदेंच्या ‘या ‘आमदाराच्या दाव्याने खळबळ..


पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते आणि विधानपरिषद आमदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. ठाकरे गटाचे जवळपास सर्व आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दसरा मेळाव्याच्या तोंडावर ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार आहे.कृपाल तुमाने यांनी असे म्हटले आहे की, ठाकरे गटाच्या दोन आमदारांना वगळता, बाकीचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे 60 टक्के नगरसेवक आधीच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे आले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या तोंडावर केलेल्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळाव्याला दोन्ही गट आपली ताकद दाखवणार आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढे बोलताना कृपाल तुमाने यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “संजय राऊत यांना सकाळी भोंग्यासारखं बोलायची सवय लागली आहे. काहीही बोलायचे म्हणून ते बोलतात. दसरा मेळाव्यात ते काय धमाका करतील, आम्हीच त्यांना दसरा मेळाव्यानंतर धमाका देणार आहोत,” असं त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!