बावनकुळे साहेब हा घ्या पुरावा!! आमदार रोहित पवार यांनी थेट पुरावाच दिला, आता बावनकुळे साहेब राजकीय संन्यास घेणार का?


मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये ते म्हणाले, आदरणीय बावनकुळे साहेब, मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. असे म्हणत त्यांनी एक पुरावाच दिला आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, तुमच्याच पक्षाचे आमदार मा. बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे. दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का?

एकंदरीतच यावरून असे दिसून येते की, गावातील लोक जेव्हा पाणंद रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता. अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार? राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या. आहे का हिंमत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे सध्या यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याला बावनकुळे काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!