‘डीमार्ट ‘च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! लवकरच ‘या’ वस्तू होणार स्वस्त, पहा संपूर्ण यादी….


पुणे : अलीकडेच केंद्रातील सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने जीएसटीचे चार स्लॅब कमी करून दोन स्लॅबची नवीन सिस्टीम लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता फक्त 5 टक्के आणि 18% असे दोन स्लॅब राहिले आहेत. या निर्णयामुळे अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. डी मार्ट मधील वस्तूंच्या किमती देखील आता लवकरच कमी केल्या जाणार आहेत. त्यामुळे डी मार्ट ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्रातील सरकारच्या जीएसटी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी 22 सप्टेंबर पासून होणार असून यानंतर डी मार्ट मधील वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. अशा स्थितीत आता आपण डी मार्ट मधील कोणत्या वस्तू स्वस्त होणार याची यादी या ठिकाणी पाहणार आहोत.

या वस्तू होणार स्वस्त

केंद्रातील सरकारने काही वस्तूंवरील जीएसटी शून्य केली आहे. यात शैक्षणिक वस्तूंचा सुद्धा समावेश आहे. मॅगझिन्स, चार्ट्स, नकाशे, पाठ्यपुस्तके, सराव पुस्तके, इरेझर आणि स्टेशनरीवरील जीएसटी शून्य करण्यात आली आहे. अर्थात या वस्तूंच्या किमती आता कमी होणार आहेत.तसेच मिक्सर, ग्राइंडर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी 18% करण्यात आला आहे. आतापर्यंत यावर 28 टक्के जीएसटी होता. म्हणजे या इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा आता स्वस्त होणार आहेत.

त्याचबरोबर चॉकलेट्स, मिठाई, बिस्किटे, आईस्क्रीम, नमकीन तसेच सॉफ्ट ड्रिंक्सवरील जीएसटी रेट सुद्धा कमी झाले आहेत. साबण, हेअर ऑईल, टूथपेस्ट, टॉयलेट क्लीनर, डिटर्जंट, धूप, अगरबत्ती, मेणबत्त्यांवर आता फक्त पाच टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
यामुळे या पण वस्तू स्वस्त होतील. चहा, कॉफी, दूध पावडर या वस्तू सुद्धा आता स्वस्तात मिळणार आहेत. या वस्तूंवरील जीएसटी सात टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!