मोठी बातमी! प्राचीन तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या ‘नाशिक’ ला लवकरच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार? जिल्हा प्रशासनाकडून गती…


नाशिक : भारतातील प्राचीन तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या नाशिकला अद्याप तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. मात्र, नुकताच त्र्यंबकेश्वरला ‘अ’ दजांचा तीर्थक्षेत्राचा मान मिळाल्यानंतर नाशिकसाठीही या मागणीने जोर धरला आहे. आता संत समुदायाच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाला गती आली असून लवकरच नाशिकलाही तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राचीन तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या नाशिकमध्ये २०२७ ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासकीय स्तरावर जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी साधू-महंतांकडून केली जात आहे. असे असतानाच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासाठीच्या प्रस्तावात सुधारणा करून हरिद्वारच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र दर्जा देण्यात यावा, अशी मागणी संत समुदायाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.तपोवनात आखाड्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी साधू-महंतांशी चर्चा केली. या बैठकीत साधूंनी हरिद्वारच्या धर्तीवर नाशिकला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

दरम्यान या प्रस्तावात नाशिकच्या धार्मिक महत्त्वाचे वर्णन, कुंभमेळ्याचा इतिहास आणि भाविकांच्या संख्येच्या आधारावर शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!