कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता खाजगी क्षेत्रात 10 तास, तर कारखान्यात 12 तासांची ड्युटी, सरकारचा मोठा निर्णय…


मुंबई : कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील खासगी आस्थापनांत दैनंदिन कामकाजाचे तास नऊवरून दहा तास करण्यासाठी कायद्यात संशोधनासाठी मंजुरी देण्यात आली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासगी क्षेत्रात सध्या एक दिवसाच्या शिफ्टमध्ये नऊ तास काम करणे निश्चित केलेले आहे. याबाबत आता रोजच्या कामात आणखी एक तास वाढणार आहे. अगोदर कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा राज्यात हा निर्णय लागू आहे. आता महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय गुंतवणूक आधिकाधिक आकर्षित करण्यासाठी, रोजगारात वाढ करण्यासाठी तसेच कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. कारखान्यांमधील कामगारांच्या कामांचे तास 9 तासांवरून 12 तास करण्याचाही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्मचारी याबाबत विरोध करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याबाबत कामगारांची टंचाई आणि पीक अवर्सच्या काळात कोणत्याही अडचणींशिवाय काम करण्याची परवानगी मिळणार आहे. कामगारांना ओव्हरटाइमचा योग्य मोबदला मिळेल याचीही काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

दररोजच्या कामाचा वेळ 9 तासांवरून 12 तास केला जाईल. तसेच पाच तासांऐवजी सहा तासांनंतर विश्रांतीसाठी वेळ दिला जाईल, असेही सांगितले जात आहे. याबाबत सरकारकडून वेगवेगळी धोरणे जाहीर करण्यात आली आहेत. सध्या कर्मचाऱ्यांना किती सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार हे लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!