धक्कादायक! सोलापुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 जणांना विषबाधा ; काय आहे प्रकरण?


सोलापूर : सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 170 जणांना अन्नातून विषबाधा झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास 1400 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान काल सायंकाळी प्रशिक्षणार्थ्यांना उलट्या जुलाब आणि मळमळ याचा त्रास सुरू झाला. यामध्ये केंद्रातील तब्बल 170 जणांना अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 17 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर 170 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने प्रशिक्षण केंद्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!