सरकारचं आणि आमचं वैर संपलं, उपोषण सोडायला या ; जीआर हाती येताच जरांगेच आवाहन…


मुंबई : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. सरकारकडून हैद्राबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला. हा जीआर मनोज जरांगे पाटील यांच्या हाती देण्यात आला.त्यांनी जीआर स्वीकारत सरकारचे आभार मानले. तसेच सरकारचं आणि आमचं वैर संपलं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनीं जीआर मिळाल्यानंतर सरकारचे आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की, विखे-पाटील, सामंत, सरनाईकसाहेब हे सर्वजण इथे आले आहेत. माझी एक इच्छा आहे या सर्व कामाचे श्रेय विखे-पाटील यांना जातेच पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडायला यावे. तुमचं आणि आमचं वैर संपलं.’ तसंच, ‘मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे.’, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘चांगल्या कामासाठी आमच्या घरी स्वागत राहिल.’, असे विखे पाटील यांनी जरांगेना सांगितले.

दरम्यान जीआर मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारने काढलेल्या जीआरची प्रत घेऊन मराठा उपसमितीचे सदस्य जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे जीआर सोपवण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!