मोठी बातमी! छगन भुजबळ यांना धक्का, आंदोलनाबाबत पोलिसांचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?


मुंबई : सध्या राज्यात मराठा आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी करत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

असे असताना आता ओबीसी समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज जरांगे पाटील यांच्या गावात आंदोलन करणार आहे. अंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत मात्र आता या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. यामुळे वातावरण अजूनच तापले आहे. मंत्री छगन भुजबळ याबाबत आक्रमक झाले आहेत

आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. अशी माहिती आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज जालन्यातील आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे आमरण उपोषण करणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परवानगी नाकारल्यानंतर आम्हाला आंदोलनाचा अधिकार आहे असा आक्रमक पवित्रा घेत ओबीसी नेते बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने आंतरवाली सराटीमधील सोनिया नगरमध्ये आंदोलन करण्यास ठाम आहेत. यामुळे याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!