सरकार ॲक्शन मोडवर ; शरद पवारांच्या भेटीपूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री मनोज जरांगेंची भेट घेणार?


मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आझाद मैदानात रणशिंग फुकल आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, त्यांची तब्येत खालावत आहे मात्र आरक्षणाच्या मागणीवरती ते ठाम आहेत. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आले असतानाच आता दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यापूर्वी मनोज जरांगे यांची तातडीने मुंबईत जाऊन भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगेच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. मात्र, ते दर्शन घेऊन मुंबईकडे तातडीने रवाना होणार असल्याची माहिती आहे. तर, पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालयाचे उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असून ते देखील तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईत दाखल होत जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज पुन्हा मराठा उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकी देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा याचे देखील नियोजन सरकारकडून केले जात असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!