हडपसर महापालिकेसाठी सर्वपक्षीय एकत्र, बैठकीत मोठा निर्णय….!


हडपसर : पुण्यात सध्या नवीन महानगरपालिका निर्माण होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असताना हडपसर पूर्व भागासाठी नवीन स्वतंत्र महापालिका होण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. याबाबत एक बैठक देखील झाली आहे.

पूर्व भागाच्या विकासासाठी ही महापालिका झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडत यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार राजकीय नेते व विविध संघटनांच्या बैठकीत करण्यात आला. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

याबाबत हडपसरचे आमदार म्हणाले, हडपसरलगत गावांच्या विकासासाठी ‘ब’ दर्जाची महापालिका होण्यासाठी मी सातत्याने विधानसभेत प्रश्न लावून धरला आहे. पूर्व भागाच्या विकासासाठी स्वतंत्र महापालिकेची आवश्यकता आहे.

राज्य सरकारने पूर्व हडपसर ही स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर येथे मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, हडपसर भाजीपाला सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आदि उपस्थित होते.

प्रवीण तुपे म्हणाले, वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे महापालिका हडपसर व उपनगरांतील गावांचा विकास करू शकणार नाही. त्यामुळे हडपसरपासून वाघोली, उरुळी कांचनपर्यंत नवीन ‘ब’ दर्जाची महापालिका झाली पाहिजे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!