धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार ; व्ही. राधा यांची फाईलच गायब केल्याचा अंजली दमानियांचा दावा


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातल्या भ्रष्टाचाराची आणि गौडबंगालाची फाईल गायब केली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कृषी विभागावरचे आरोप चर्चेत आले आहेत.

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी त्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांना गुरूवारी पाठिवलेल्या एका पत्राचा संदर्भ दिला आहे. कक्ष अधिकारी रुचिता पिंगळे यांचे हे पत्र आहे. हे पत्रही दमानियांनी पोस्ट केले आहे.दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडेंनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाइल गायब केली आहे. व्ही. राधा या कृषी सचिव असताना कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाइल धनंजय मुंडे यांनी गायब केली.आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे, पण ही फाईल त्यांच्या कडून राजीनाम्यानंतर परत आली नाही. धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.

दरम्यान रिपोर्टची फाईल त्यांनी पुन्हा कृषी विभागाकडे द्यावी असेही त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे, असं यावर बोलताना दमानिया यांनी माहिती दिली, दरम्यान या रिपोर्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!