बनावट सोने देऊन सराफ दुकानदारांची फसवणुक करणाऱ्या टोळीला युनिट ६, गुन्हे शाखेने केले जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त..


लोणी काळभोर : बनावट सोने खरे असल्याचे भासवून सराफ दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या तिन जणांच्या टोळीला पुणे शहर युनिट ६, गुन्हे शाखेने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी रोहित संजय गोरे, (वय ३०, रा. ओम अपार्टमेंट,मोहन नगर, धनकवडी, पुणे), अजय दत्तात्रय पवार, (वय २८) व ओम सुंदर खरात, (वय २३, दोघे रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे. युनिट ६ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीव्दारे पुणे शहरामध्ये ज्वेलर्स दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे व्यक्ती हे खांदवेनगर, वाघोली परिसरात फिरत आहेत. अशी माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या वर्णनांच्या तिघांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चंदननगर, काळेपडळ, पर्वती व आंबेगाव या चार वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत एकुण ४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अटक केलेल्या आरोपींकडून ३ लाख रूपये रोख रक्कम, १ रूपये किंमतीचे मोबाईल फोन व ४ लाख रुपये किंमतीचे हॉल मार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने असा एकुण ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास चंदननगर पोलीस स्टेशन करीत आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा २ पुणे शहर राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक युनिट ६ गुन्हे शाखा वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट -६ चे सपोनि राकेश कदम, मदन कांबळे, पो अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!