बिग बॉसच्या घरात कोण जाणार? स्पर्धकांची यादी अखेर समोर, यादीत थक्क करणारी नावे…


मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ ऑगस्ट रोजी या शोचा प्रीमिअर पार पडणार आहे.

यंदाच्या एकोणिसाव्या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. या सिझनमध्येही १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहणार असून, त्यातील अनेक थक्क करणारी नावं समोर आली आहेत.

निश्चित झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे..

गौरव खन्ना – ‘अनुपमा’ फेम अभिनेता, या सिझनमधील सर्वांत महागडा स्पर्धक मानला जातो.

अशनूर कौर – लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री; तिचा पहिला रिऍलिटी शो.

आवेज दरबार आणि नगमा मिराजकर – चर्चेत असलेली कंटेंट क्रिएटर जोडी; अलीकडेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

बशीर अली – ‘रोडीज’, ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘ऐस ऑफ स्पेस’ फेम.

अभिषेक बजाज, हुनर हाले आणि शफक नाज – तिघेही पहिल्यांदाच रिऍलिटी शोमध्ये सहभागी होत आहेत.

सिवेट तोमर आणि खनक वाघनानी – रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सविला’मध्ये झळकलेले कलाकार.

पायल धरे – गेमिंग व्हिडिओ क्रिएटर

जीशान कादरी – लेखक व अभिनेता

मृदुल तिवारी – युट्यूबर

शाहबाज बदेशा – शहनाज गिलचा भाऊ

श्रीराम चंद्र -‘इंडियन आयडॉल 5’ फेम गायक, ‘बिग बॉस तेलुगू 5’चा रनरअप

अरबाज पटेल – ‘बिग बॉस मराठी’ फेम

निधी शाह – ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री

किरक खाला ऊर्फ प्रिया रेड्डी – कंटेंट क्रिएटर

अथुल किशन – सामाजिक कार्यकर्ते

अली काशिफ खान – वकील

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!