Mumbai BEST Election Results : बॅलेट पेपरवर निवडणूक, तरीही ठाकरे बंधूंचा पराभव ; एकही जागा मिळाली नाही..


पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र या निवडणुकीच्या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे.प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीसाठी 18 ऑगस्ट रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. यानंतर 19 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. पण मुंबईतील मुसळधार पावसामुळे मतमोजणीला उशीर झाला. यामुळे मंगळवारी रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर झाला.मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे.त्यामुळे ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसेला एक मोठा धक्का बसला आहे.

बेस्ट पतपेढीच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत झाली. यात शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. मात्र या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना एकही जागा मिळालेली नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!