मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मुख्यमंत्र्यांना गंभीर दुखापत झाल्याची अधिकृत पुष्टी नाही, मात्र घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात जनता दरबार सुरु असताना ही घटना घडली. रेखा गुप्ता जनता दरबारात होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले.

मात्र, हा व्यक्ती अचानक आक्रमक झाला त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळया व्यक्तीने अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या. त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केले. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!