राज्यात मुसळधार पावसाचं थैमान; तब्बल 10 लाख एकर जमीन पाण्याखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार वॉर रूममध्ये, दिले महत्त्वाचे आदेश…


पुणे : गेल्या तीन -चार दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातल आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार पाण्यात गेले आहे. मुंबई आणि उपनगरांना येत्या 12 तासांत रेड अलर्ट आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे राज्यातील तब्बल दहा लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.

या पार्श्वभूमीवरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती देऊन त्यावर उपाय योजनांविषयीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई आणि परिसरातील परिस्थितीचा आणि राज्यातील पूर स्थितीचा आढावा घेतला.नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे नियोजन सुरू आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागाला रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. दर तीन तासांनी हवामान खाते अहवाल देत आहे.

मुंबईत गरजेचे नसेल तर बाहेर न पडण्याचे सरकारने आवाहन केले आहे.राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. पंचनामे काम करण्याचे काम सुरू होतील. जिथे पुराचा फटका, पावसाचा फटका बसला आहे, तिथे बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर जलसंपदा विभागाला खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी सांगितली.

दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक तर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सगळे जण परस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. बहुतेक ठिकाणी धरणं ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे पाणी सोडताना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता त्या दर्जाचा अधिकारी ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!