आता ग्रामपंचायतीकडून डिजिटल क्युआर कोडवर कर वसुली, बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावाकडून पहिल्यांदाच उपक्रम सुरू…


बारामती : स्वातंत्र्यदिनी बाबुर्डी ग्रामपंचायतीमध्ये क्यू आर कोड आधारित करवसुली व इतर सुविधा यांचा शुभारंभ करण्यात आला आहे. बाबुर्डी ही बारामती तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत अशा प्रकारची अत्याधुनिक पद्धतीने कर वसुली करणारे ठरली आहे. याची चरचा सगळीकडे सुरु आहे.

तसेच बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, सहायक गटविकास अधिकारी श्री. जरांडे, उपअभियंता बांधकाम श्री. कुपल तसेच विस्तार अधिकारी पंचायत श्री. चांदगुडे, श्री. भागवत, श्री. दनाने, श्री शेटे, श्री सतीश बोरावके यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी श्री. किशोर माने यांनी क्यू आर कोड आधारित करवसुली व इतर सेवा याची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली आणि ग्रामपंचायतीला पुढील कार्यास शुभेच्छा देऊन या संकल्पनेच्या आधारे १०० टक्के करवसुली करण्यास उपस्थितांना आवाहन केले.

दरम्यान, यावेळी सरपंच दत्तात्रय ढोपरे, उपसरपंच सौ. मंगल लव्हे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, सदस्य रुपाली लडकत, अर्चना पोमणे, संतोष पोमणे, लक्ष्मण पोमणे, सचिन लडकत, देवराज पोमणे, सुरेश राऊत, रवी केदार, ज्ञानेश्वर महानवर, सागर पोमणे, बाळासो शेंडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशासेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. निलेश धारकर आणि माजी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी आभार मानले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!