ठाण्यात इमारतीला भीषण आग ; 22 व्या मजल्यावर अडकलेल्या महिलेचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू


मुंबई : ठाण्यातील कोलशेत भागातील लोढा अमारा इमारतीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या आगीची तीव्रता इतकी होती की, 22 व्या मजल्यावर अडकलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर घटनास्थळी असलेल्या दोन व्यक्तींना धुराचा त्रास झाल्यामुळे हायलँड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोलशेत भागातील लोंढा परिसरात इमारतीला लागलेल्या आगीचा प्रभाव इतका तीव्र होता की संपूर्ण २२ व्या मजल्यावर आणि त्या मजल्यावरील लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः २२०३ क्रमांकाच्या फ्लॅटचे प्रचंड नुकसान झाले. आगीसोबत निर्माण झालेल्या दाट धुरामुळे इमारतीतील शेकडो रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
आग लागल्याची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी तीन ते चार अग्निशमन गाड्यांनी सलग प्रयत्न सुरू केले आणि सुमारे रात्री ७ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी आणि स्थानिक रहिवाशांनी मिळून अंदाजे ३७५ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.दरम्यान, ठाणे महापालिका व पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!