धुळे -सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात ; चालक सहचालक गंभीर जखमी


नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात ट्रकचे दोन तुकडे झाले असून ट्रकचा चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कोंडाईबारी घाटातुन मालाने भरलेला ट्रक जात असताना चालकाचा ताबा सुटला. यात ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि एका मोठ्या धडकेनंतर त्याचे अक्षरशः दोन तुकडे होऊन ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. यामध्ये ट्रकचा चालक आणि सहचालक वाहनाच्या केबिनमध्ये दाबले गेले होते. स्थानिक नागरिकांनी आणि मदतीसाठी धावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढत तातडीने त्यांना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान या भीषण अपघातानंतर ट्रकमधील संपूर्ण लोखंडी सळ्यांचा माल रस्त्यावर पडल्याने महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!