कदमवाकवस्ती येथील बेकरीतील केकमध्ये आढळल्या आळ्या! अन्न व औषध विभाग कारवाई करणार?


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट येथील राजधानी बेकरीमधील केकमध्ये आळ्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

यासंदर्भातील सविस्तर हकीकत अशी की तेथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेने आपल्या मुलांसाठी राजधानी बेकरीतून केक खरेदी केला. घरी गेल्यानंतर तो कापला त्यावेळी त्यामध्ये आळ्या असल्याचे निदर्शनास आले.सदर बाब लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना कळताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांच्या नेतृत्वाखाली पथक तेथे पाठवले.

बेकरीमधील केक व इतर खाद्यपदार्थ ताब्यात घेऊन ते अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच प्राथमिक कारवाई म्हणून बेकरी तात्काळ सील करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार अन्नपदार्थामध्ये आळ्या, कीड, अशुद्धता किंवा हानिकारक घटक आढळल्यास हा गंभीर गुन्हा मानला जातो. दोष सिद्ध झाल्यास कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.

अन्न व औषध प्रशासन केकचे नमुने तपासून अहवाल तयार करेल. अहवाल आल्यानंतर FSSAI Act 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करून बेकरी मालकावर कठोर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. परिसरात या घटनेची मोठी चर्चा रंगली असून पालक संघटनांनी अन्नसुरक्षा विभागाने अशा बेकऱ्यांची नियमित तपासणी करण्याची मागणी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!