आई, मी गेल्यावर रडू नकोस; गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच बॉयफ्रेंडनं उचललं टोकाचं पाऊल, जळगाव येथील घटनेने हळहळ..


जळगाव : प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिल्यामुळं तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना जळगावमधून समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी या तरूणाने त्याच्या सोशल मिडीया इंस्टाग्रामवरती त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘मी एका तरुणीसोबत चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही लग्नही केले होते. पण त्यावेळी आमचे दोघांचे वय कमी होते. आता मात्र त्या तरुणीने लग्नासाठी नकार दिला आहे, तू मला विसरून जा’, असं ती मला सांगत आहे.

पुढे तो व्हिडीओमध्ये म्हणतो की, चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ती मला विसरून जा. असं कसं सांगू शकते तू? असा सवाल देखील या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे. आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. वडील खूप गरीब आहेत, त्यांना त्रास देऊ नकोस, त्यांना पण सांग, जास्त रडू नका, असं देखील गौरव बोरसे याने या व्हिडिओमधून म्हटलं आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरवने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

‘प्रेमात मी खूप दुःखी आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही हा निर्णय घेऊ नका माझे वडील खूप गरीब माणूस आहे. प्रेमामध्ये चुकीचा निर्णय मित्रांनो घेऊ नका. जो आज मी प्रेमामध्ये चुकीचा निर्णय घेत आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मित्रांनो मला माफ करा. मला प्रेमात खूप त्रास होत आहे, म्हणून मी हा निर्णय घेत आहे’, असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!