आता विद्यापीठात व्हाईस ऑफ देवेंद्र!! भाजपचा नवीन अजेंडा, रोहित पवारांची टीका, नेमकं प्रकरण काय?


पुणे : पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पुणे अहिल्यानगर व नाशिक मधील सर्व संलग्न महाविद्यालयांना पत्र पाठवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या व्हाईस ऑफ देवेंद्र या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आग्रह करावा अशा स्वरूपाचे पत्र पाठवले आहे.

तसेच यावरून आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठासह शिक्षण विभागाला घेरले आहे. रोहित पवार म्हणाले, विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचे नसते, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो.

निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचे संपूर्ण देश बघत आहे, आता शिक्षणाची मंदिरे असलेली विद्यापीठे देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा?, असे ते म्हणाले आहे.

विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच Voice of Democracy मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील. अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विकसित महाराष्ट्र या नावाखाली व्हाईस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय स्पर्धा सर्वांनी राबवावी असे आवाहन केले आहे. हा विषय आता चर्चेत आला आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं काय चालले आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!