अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत मोठे बदल ; मुख्य रस्ते दिवसभर असणार बंद


पुणे : अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन बदलले आहे. शहरातील मुख्य रस्ते दिवसभर बंद करण्यात येणार आहेत.वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे

पुण्यातील आप्पा बळवंत चौकाकडून बुधवार चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता संपूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाणाऱ्या मार्गांपैकी बाजीराव रोड आणि शिवाजी रोडही मंगळवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहतील. या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनवाहतूक होऊ नये यासाठी पोलिस ताफा तैनात करण्यात आला आहे.

. पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जे एम रोडमार्गे पुढे जावे, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी सर्व वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच पायी जाणाऱ्या भाविकांनी वाहतुकीच्या दिशानिर्देशांचे पालन करून गर्दीत ढकलाढकली टाळावी, असेही सांगण्यात आले आहे. या बदलांमुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक सुरळीत राहील आणि भाविकांना सुरक्षितरीत्या दर्शन घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!