“अरे त्या म्हस्केला सांग… दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला…; संतापलेल्या संजय राऊतांची जीभ घसरली

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा अपमान झाल्याचा दावा खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी खोडून काढला आहे. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आमदार आदित्य ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली. खासदार नरेश म्हस्के यांच्या टीकेला उत्तर देताना राऊंतानी .”अरे त्या म्हस्केला सांग… दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान-अपमान?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंडिया आघाडीच्या बैठकीमधील फोटो समोर आल्यापासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना ठाकरे गटाची प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं जात आहे. शिंदेंच्या पक्षाने केलेल्या टीकेवरुनही राऊतांनी उत्तर देताना कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.स्क्रीनवरील प्रेझेंटेशन स्पष्ट दिसत नसल्याने पुढल्या रांगेतून आम्हीच मागील रांगेत बसायला गेलो, असं राऊत म्हणालेत. महाराष्ट्रातून इथे येऊन मोदी आणि शहांची चाटुगिरी करता. तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं आम्ही बघू की,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान बैठकीत आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे… शिवरायांचा वारसा सांगता ना रे… कॉग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे?” असं पोस्टच्या पहिल्या ओळीत म्हस्केंनी म्हटलं आहे. “बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?” असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला होता. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिल आहे.
