सोलापूरमध्ये दोन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणाने आयुष्य संपवलं, शेवटचे लोकेशन पाठवत सांगितल आत्महत्येचे कारण..

सोलापूर : सोलापुरातील तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमर लहू मुळे असे मयत 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला हता या व्हिडिओमध्ये तरुणाने पाच जणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे.

अमर मुळे हा वाहन चालवण्याच्या कामासोबत खासगी कंपनीत नोकरी करत होता. सहा जून रोजी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव गावातील विजय सुरवसे यांची कन्या ऋतुजा यांच्यासोबत त्याचा विवाह झाला होता. त्याने वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्यापूर्वी आत्याच्या मुलाच्या मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले.
अमरच्या आत्महत्येने नान्नज परिसरात खळबळ उडाली आहे. अमर मुळे या युवकाने आत्महत्या करण्याअगोदर स्वतःच्या मोबाइलमध्ये मी आत्महत्या करत आहे. पाच व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे, असा व्हिडीओ बनवून आत्याचा मुलगा आदेश यांच्या मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले आहे.

दरम्यान, नातेवाईकांनी गायरान झुडपात शोध घेतला तेव्हा त्याचा मृतदेह दिसून आला. अमरने विनंती केली की, खंबीरपणे आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहा, माझ्या मोबाइलमध्ये फोटो व रेकॉर्डिंग आहे. त्याचा पासवर्डही सांगितला आहे. अमरचे वडील, चुलते, चुलतभाऊ व नातेवाइकांनी त्या ठिकाणावर रात्रभर शोधाशोध केली.
दरम्यान, या घटनेची चौकशी केली जाणार आहे. याबाबत अजून कोणाचे नावे समोर आली नाहीत. मात्र त्याने आत्महत्या का केली? याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याने मोबाइलवर व्हिडीओ व आत्महत्या करत असल्याच्या ठिकाणाचे लोकेशन पाठवले आहे. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.