दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग ; एकनाथ शिंदेंनी मध्यरात्री घेतली भाजपच्या नेत्याची भेट..

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत.मुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर त्यांनी खासदारांची बैठक घेतली. त्याचबरोबर भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच ही भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपली कार बदलली होती,असा दावाही करण्यात आला आहे. मात्र भेटीचे अद्याप कारण समोर आले नाही. यामुळे माहिती सर्व काही अलबेल आहे ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. महायुतीमध्ये भाजपने काही जिल्ह्यात ‘शत प्रतिशत’चा नारा बुलंद करण्याची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे
