अखेर ठरलं! ‘दौंडचे माजी आमदार रमेश थोरात ‘या’ दिवशी करणार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, शरद पवारांना मोठा धक्का..

दौंड : मागील काही दिवसापासून दौंडचे माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडून पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच आता यावरती शिक्कामोर्तब झाले आहे.

उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे घर वापसी करणार अशा चर्चा होत्या.
मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यामुळे या चर्चांना अधिक ऊत आला होता. आता एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजित पवार गटात पक्ष पवेश होणार आहे.

दौंड तालुक्यातील वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या मेळाव्यात माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान, भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.यंदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती झाल्यानंतर रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली होती.मात्र त्यांचा या निवडणुकीतही पराभव झाल्याने ते काहीसे नाराज होते.