वसईत छापा ; तब्बल 18 तास ईडीकडून चौकशी, माजी आयुक्त अनिलकुमार अडचणीत?

पुणे : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीकडून थेट कारवाई करण्यात आली आहे.सकाळी सात ते रात्री दीड वाजेपर्यंत ईडी अधिकारी यांनी अनिलकुमार पवार यांची चौकशी केली. या कारवाईत ईडीने कुणालाही ताब्यात घेतले नसून, काही कागदपत्र, हार्ड डिस्कमधील मोठा डाटा जमा करून घेतला आहे. रात्री दीड वाजता अधिकारी आयुक्त निवास्थानातून बाहेर पडले. तब्बल 18 तास ईडीकडून चौकशी सुरू असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तब्बल 18 तास वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण झाली. या चौकशीत नेमके काय सापडले? कोणाचे धागेदोरे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हाताला लागले हे मात्र ईडीच्या अधिकृत माहितीनंतर समोर येणार आहे. दरम्यान कालपासून सुरू असलेल्या छापेमारीत अनिल कुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी ही तब्बल एक कोटी 25 लाख रुपये रोक रक्कम सापडली आहे. दरम्यान ईडीच्या प्राथमिक तपासात पवार यांनी प्रशासकीय पदावर असताना कायद्याच्या पळवाटा शोधून सदर प्लॉट आपल्या नावे केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात कागदपत्रांची आणि व्यवहारांची बारकाई तपासणी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान ही कारवाई आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असून लवकरच आणखी काही मालमत्तावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ईडीच्या या हालचालीमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.दुसरीकडे माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. फक्त दावाच नाही तर त्यांनी थेट गंभीर आरोप देखील केले आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
