दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ वेबसाईटवर तपासा तुमचे निकालपत्र…


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज २९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले आहेत. mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना आपले निकाल तपासता येणार आहेत.

ही पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२५ दरम्यान पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या नऊ विभागीय केंद्रांमध्ये घेण्यात आली होती. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया न घालवता पुढील शिक्षणाची संधी मिळणार आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..

mahahsscboard.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर भेट द्या.

“Maharashtra HSC/SSC Supplementary Result 2025” लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर व आईचे पहिले नाव टाका.

सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

भविष्यातील वापरासाठी निकाल डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.

दरम्यान, या परीक्षा त्या विद्यार्थ्यांसाठी असतात जे मुख्य परीक्षेत नापास झाले होते, किंवा ज्यांना एटीकेटी (ATKT) मिळाली होती, तसेच जे गुण सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ इच्छित होते.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!