प्रांजल खेवलकरांनी केलेलं मद्यपान, ड्रग्स कोणी कोणी घेतलं?, ससून वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा, धक्कादायक माहिती उघडकीस..

पुणे : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथून रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या या कारवाईनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. सदर प्रकरणी सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सदर प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे अहवालातून समोर आले आहे. पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलीसांनी अटक केली.

त्यांची ससून रूग्णालयात वैदयकीय तपासणी केली असता सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाह पोलीसांनी दिलाय. सातपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

पोलिसांनी शनिवारी (ता. 27 जुलै) पहाटे या पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि सहा इतरांना अटक केली होती. त्यानंतर सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता, रोहिणी खडसे, रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट अचानक रद्द करण्यात आली. पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला. रोहिणी खडसे यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
या बैठकीत पतीवर झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती होती. मात्र रोहिणी खडसे वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे भेट रद्द झाली, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.