पुण्यात रेव्ह पार्टीत धाड ; 2 महिला आणि 5 पुरुष ताब्यात ; एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत सहभागी …!!


पुणे : पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटवर हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी करत मोठी कारवाई केली. या प्रकरणात एकूण सात जणांना ताब्यात घेतल असून यामध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा सहभाग आहे. या पार्टीमध्ये बड्या महिला नेत्याचा पती सहभागी असल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये राजकीय कनेक्शन उघड झाले आहे. राज्यातील बड्या महिला नेत्याच्या पतीला पोलिसांनी या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं आहे. खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी २ महिला आणि ५ पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन केले जात होते.

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या रेव्ह पार्टीमध्ये राज्यातील राजकीय पक्षाच्या बड्या महिला नेत्याचा पती सहभागी झाला होता. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण ७ जणांना ताब्यात घेतलं आहे यामध्ये ५ पुरूषांचा सहभाग आहे.. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या मध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश असल्याचे आढळून आल आहे. ते एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती असल्याची माहिती समोर आली आहे. याच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे पार्टीत सहभागी असलेल्यांची झोप उडाली आहे.

या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये गांजा आणि इतर अमली पदार्थांचा साठा, मोठ्या प्रमाणात महागड्या दारूच्या बाटल्या, हुक्का पॉटस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान ही कारवाई सुरू असताना तीन तरुणी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या फरार तरुणींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावांच्या आधारे त्यांचा माग काढला जात आहे. या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोचले आहेत याचा तपास आता पुणे पोलीस करत आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!