यंत्रणा हादरली! मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात स्फोट होणार ; धमकीचे तीन कॉल


मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीचे कॉल सत्र सुरूच आहे. आज मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एकामागून एक तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर( टर्मिनल 2)बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केल्याने यंत्रणा हादरून गेली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद सापडलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.

मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचून त्याचे हेतू शोधता येतील यासाठी तपास सुरू आहे. मात्र या धमकीच्या सलग तीन कॉलने यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!