कोकाटेंना डच्चू ; धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य


पुणे : माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे कृषी खात्यातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले होते. नुकतीच न्यायालयाने मुंडे यांना क्लीन चिट दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यात ते दोषी न आढळल्यास मुंडे यांना पुन्हा संधी देऊ असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. याप्रकरणी ते चांगलेच अडचणीत आले होते मात्र त्यानंतर आता या प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या काळात झालेल्या खरेदीत गैरव्यवहार झाला नसल्याचे चौकशीत आढळले आहे. त्यात मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आणखी एका प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्यात ते दोषी न आढळल्यास मुंडे यांना पुन्हा संधी देऊ, असे सांगून त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात येण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सतत होणाऱ्या वादग्रस्त विधानावरून आणि विधानसभेतील सभागृहात मोबाईल फोनवर रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरून त्यांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार असून त्यांचा राजीनामा आता जवळपास निश्चित मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!