मामाच्या मुलीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध, तरुणीच्या पोटात दुखू लागलं अन् धक्कादायक सत्य समोर आलं….

रायगड : जिल्ह्यातील पेण तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नात्यातच प्रेमसंबंध असलेल्या तरुण तरुणीकडून आयुष्याचा डाव खेळला गेला. यात लग्नाआधीच तरुणी गर्भवती राहिली. यामुळे सगळेच हादरले आहेत. ही तरुणी अल्पवयीन असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
येथील पेण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी तिच्या अलिबाग येथे राहणाऱ्या आत्याच्या मुलासोबत प्रेम संबंध होती. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न अठरा वर्षांनंतर करू असे आधीच सांगितले होते.
यामुळे त्यांचे लग्न ठरले होते. अलिबाग तालुक्यातील आरोपी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी येत जात असे. आपले लग्न होणार असून काही अडचण नाही असे सांगून तरुणाने तिच्याबरोबर वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलीने देखील नकार दिला नाही.
या शरीर संबंधातून अल्प वयीन पीडित मुलगी ही वीस आठवड्याची गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिल्याचे समजताच दोघांना धक्का बसला. नंतर दोघांनी एका मंदिरात जाऊन एकमेकांना हार परिधान करून एकत्रित राहू लागले. मात्र ही माहिती सगळीकडे समजली.
दरम्यान, मुलगी ही गर्भवती असल्याने तिच्या पोटात अचानक दुखू लागले. म्हणून तिला आई वडिलांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा गर्भपात झाला. यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयाकडून पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठाण्यास माहिती देण्यात आली, यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.