राहुल नार्वेकर यांच विधानसभा अध्यक्षपद जाणार, होणार कॅबिनेटमध्ये एन्ट्री?


पुणे : मागील काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर महायुतीत जोरदार हालचाली सुरू असून मंत्रिमंडळ बदलात विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्याविषयी नाराजी व्यक्त केली असताना आता त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. ते सध्या दिल्लीत असून त्यांच्या या दौऱ्यात राज्याच्या राजकीय आणि विकासात्मक पातळीवर निर्णायक घडामोडी घडल्याची माहिती समोर येत आहे. भाजपात सध्या नाराज असलेले माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर, राहुल नार्वेकर यांना आता कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान राहुल नार्वेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याच्या वृत्तावर त्यांनी भाष्य केल आहे. पक्षाचा जो काही निर्णय आहे तो मला मान्य असेल. गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे काम मी करत आहे विधानसभेचे कामकाज समाधानकारक झाले आहे. तूर्तास मी माझ्या कामावरती संतुष्ट असुन जेव्हा केव्हा मंत्रीपदाची माळ पडेल, त्यावेळी पाहू असं स्पष्ट नार्वेकर म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!