मोठी बातमी! केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खास भेट, कर्मचाऱ्यांची होणार दिवाळी, मिळणार भरपगारी सुट्टी..


नवी दिल्ली : मोदी सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता शासकीय कर्मचारी वर्षातून एकदा ३० दिवसांची रजा घेऊ शकतील. ही माहिती राज्यसभेत केंद्रीय कामगार राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तसेच या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पालकांची सेवा करण्यासाठी, किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. विशेष म्हणजे या रजेवर कोणतीही वेतन कपात होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामध्ये समतोल राखणे आता कर्मचाऱ्यांसाठी सोपे होणार आहे. केंद्रीय नागरी सेवा नियम, 1972 अंतर्गत, प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला दरवर्षी 30 दिवसांची अर्जित रजा मिळण्याचा अधिकार आहे.

याशिवाय, कर्मचार्‍यांना 20 दिवसांची अर्धवेतन रजा, 8 दिवसांची आकस्मिक रजा आणि 2 दिवसांची प्रतिबंधित रजा मिळते. ही माहिती राज्यसभेत डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधिकृतरित्या दिली आहे.

या निर्णयाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही रजा केवळ पालकांच्या देखभालीपुरती मर्यादित नसून, इतर वैयक्तिक गरजांसाठीही वापरता येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आरोग्य, मानसिक शांती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः ज्यांना आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी ही रजा मोठा आधार ठरणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे आव्हानात्मक बनले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!