धक्कादायक! पुण्यातील’ या’ विद्यापीठातील कॅन्टीनच्या जेवणात आढळल्या आळ्या, विद्यार्थी संतप्त


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहत असते. आता पुन्हा एकदा विद्यापीठातील कॅन्टीनमधील जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदीर आणि ढेकणांचा सुळसुळाट असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता विद्यापीठाच्या कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने विद्यापीठ पुन्हा चर्चेत आले आहे. हा प्रकार २२ जुलै रोजी उघडकीस आला होता. जेवणात अळ्या सापडण्याचे प्रकार वारंवार घडत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.जेवणात अळ्या आढळून आल्याचा फोटो विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. निकृष्ट पद्धतीचे जेवण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केलीय.दरम्यान या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीत विद्यापीठाने मान्य केलेल्या दरात जेवण दिलं जातं. त्यामुळे शेकडो विद्यार्थी मासिक पास काढून रिफेक्ट्रीत जेवण करतात. कंत्राटी पद्धतीने रिफेक्ट्री चालवली जाते. मात्र कंत्राटदाराकडून जेवणाबाबत कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचं दिसत आहे. कारण विद्यार्थ्यांच्या जेवणात झुरळ, अळी निघण्याचे प्रकार वांरवार होताना दिसत आहेत. तरी विद्यापीठ प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!