सैयारा पाहून तरुण मुलं रडत आहेत, पण पोलिसांची एक पोस्ट ठरत आहे चर्चेचा विषय, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : सैयारा हा चित्रपट सध्या तिकीटबारीवर अक्षरशः धुमाकूळ घालतोय. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ ७ दिवसांत तब्बल १०० कोटींची कमाई केल्याचं समजतं. यावरून या चित्रपटाची प्रचंड क्रेझ स्पष्टपणे जाणवते. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक तरुण-तरुणी थिएटरमधून भावनावश होऊन रडत बाहेर पडताना दिसत आहेत.

काही जण आपल्या एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडच्या आठवणीत बेशुद्ध पडल्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे याने ‘सैयारा’ या डेब्यू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रदार्पण केले असून त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात २०० कोटींहून अधिक कमाई केली असून हा चित्रपट तरूणाईच्या गाळ्यातला ताईत बनला आहे. चित्रपट पाहून तरूणाई भावूक झाल्याने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे अपूसकच तरूणाईच्या जिव्हारी लागलेला हा चित्रपट नेमका आहे तरी कसा? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

सैयारा चित्रपटाबद्दल अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी भावनिक पोस्ट व्हायरल केली असून या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाबद्दल अहमदाबाद वाहतूक पोलिसांची ‘X’ आकाऊंटवरील एक पोस्ट व्हायरल होत आहे. ‘सैयारा’ या चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत “तुमच्या सैयारासोबत (प्रेयसीसोबत) फिरायला जात आहात? तर हेल्मेटलाही घेऊन जा.. नाहीतर तुमचीही प्रेमकथा अपूर्ण राहील.” असे त्यांनी लिहले आहे.
सैयारा के साथ ड्राइव पर जा रहे हो?
तो हेलमेट को भी साथी बनाओ…
वरना प्यार अधूरा रह जाएगा ।#saiyaarawithhelmet #helmethaizaroori #saiyaara #saiyaaramovie2025 @GujaratPolice pic.twitter.com/tsPSX5qumS— AHMEDABAD TRAFFIC POLICE (@PoliceAhmedabad) July 24, 2025